Skip to main content

नेहमीचे प्रश्न

Marathi

प्रोजेक्ट किती विद्यार्थ्यांमध्ये बनवायचा आहे ?

एक प्रोजेक्ट एकच विद्यार्थी बनवेल. परंतु शाळा सर्व विद्यार्थ्यांना (६ वी, ७ वी, ८ वी) प्रोजेक्ट लिहायला सांगून त्यामधून सर्वोत्तम ६ प्रोजेक्ट कार्निवल साठी पाठवू शकतात.

विद्यार्थी प्रोजेक्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतील ?

विद्यार्थी सुरुवातीला फक्त फुलस्केप कागदावर प्रोजेक्टची माहिती व चित्र काढतील व कार्निवल साठी जमा करतील.

विद्यार्थी प्रोजेक्ट कोणत्या विषयावर बनवतील?

शाश्वत विकास ध्येय मधील

SDG Climate Action
हवामान क्रिया
SDG Quality Education
गुणवत्तापूर्ण शिक्षण
SDG ZERO HUNGER
उपासमारीचे समूळ

या ३ विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी प्रोजेक्ट लिहू शकतात

प्रोजेक्ट लिहिताना त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा सहभाग अपेक्षित आहे ?

प्रोजेक्ट लिहिताना त्यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवलेली समस्या, त्या समस्येची उपाययोजना व त्यासाठी बनणाऱ्या मॉडेलचे रेखाचित्र काढणे अपेक्षित आहे.

प्रोजेक्ट जमा करण्याची अंतिम तारीख कोणती असेल?

शाळेने स्पर्धेसाठीचे अंतिम ६ प्रोजेक्ट १५ जानेवारी पर्यंत जमा करायचे आहेत.

एका शाळेमधून किती स्पर्धक सहभागी होवू शकतात ?

एका शाळेमधून सहावी, सातवी आणि आठवी मधून प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण ६ विद्यार्थी सहभागी होवू शकतील. एका वर्गाच्या २ किंवा ३ तुकड्या असतील तरीही त्या वर्गाच्या सर्व तुकड्या मिळून वर्गानुसार फक्त २ प्रोजेक्टच सहभागी होतील.

आमच्या शाळेमध्ये फक्त सहावी आणि सातवी आहे. आमचे किती स्पर्धक सहभागी होवू शकतात ?

जर शाळेमध्ये फक्त २ इयत्ता असतील, तर एका इयत्तेमधून ३ स्पर्धक सहभागी होवू शकतात.

कार्निवल मध्ये एकूण किती स्पर्धक सहभागी होणार आहेत ?

नवी मुंबई महानगर पालिकेच्या ५० शाळांमधून एकूण ३०० स्पर्धक सहभागी होतील.

विद्यार्थी प्रोजेक्ट शोधण्यासाठी YouTube किंवा Google चा उपयोग करू शकतात का ?

होय. परंतु YouTube किंवा Google वरून शोधेलेला प्रोजेक्ट जसाच्या तसा नसावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा व नाविन्यतेचा समावेश असावा.

विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बनवण्याचे साहित्य Organization कडून मिळेल काय ?

Organization अंतिम फेरीत पोचलेल्या १०० स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ५००/- साहित्य विकत घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करेल.

विद्यार्थ्यांची नोंदणी कशाप्रकारे होईल ?

स्पर्धक विद्यार्थ्यांची नोंदणी व त्यांचे प्रोजेक्ट जमा करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट व What’s App ग्रुप वर लिंक शेअर केली जाईल.

कार्निवल कसा होणार आहे ?

कार्निवल मध्ये स्पर्धक Online पद्धतीमध्ये सहभागी होतील व सादरीकरण करतील.

कार्निवल मध्ये अंतिम विजयी किती असतील ?

अंतिम १०० स्पर्धक विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम १५ स्पर्धकांना विजयी घोषित केले जाईल व त्यांना बक्षिसे दिली जातील.