Skip to main content

थोडक्यात.....

सायन्स कार्निवल हा थिंक बिग प्रोग्रामचा एक मुख्य कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना नवकल्पनेसाठी उद्युक्त करणे आणि त्यांच्या विचार कौशल्याना प्रेरणा देणारा हा कार्निव्हल २०१९ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता, ज्याला विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ६ शाळांमधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून रस्ते सुरक्षा, आरोग्य आणि शेतीपासून आपत्ती व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धनापर्यंत विविध विषयांचा समावेश असणारे ५३ प्रकल्प सादर केले गेले. २०२० मध्ये कोविड-19 महामारीचा सामना करावा लागला आणि परिणामी शाळा बंद झाल्या. परंतु तरीही ऑनलाइन मोडमध्ये घेतलेल्या कार्निवलमध्ये १३ शाळांमधून ३०० विद्यार्थ्यानी सहभागी होवून कार्निवलला यशस्वी केले. कोविड-19 या महामारीमध्ये जगासोबत आम्ही सुद्धा चालत होतो. आम्ही आमचा थिंग बिग सायन्स कार्निव्हल सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन मोडमध्ये आयोजित केला, जिथे पुन्हा एकदा ५० शाळांमधून २०० हून अधिक प्रकल्प सहभागी होवून हा कार्निवल यशस्वीपणे संपन्न झाला. आम्ही आता सलग चौथ्या वर्षी परतलो आहोत.

या वर्षी, थिंक बिग सायन्स कार्निव्हल परत आला आहे, धमाकेदार आणि मोठ्या जल्लोषात !!!!!
संयुक्त राष्ट्रांनी शिफारस केलेले शाश्वत विकास ध्येय (SDGs) यांवर आधारित थीममधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक तत्वे प्रदान केली जात आहेत. 
 

Environment Conservation

Health & Hygiene

Agriculture & Food Safety

Renewal Energy and Disaster Management

 

निवडलेल्या थीम मधून खालील शाश्वत विकास ध्येय संबोधित केलेले आहेत.

SDG ZERO HUNGER
SDG Quality Education
Clean Water and Sanitation
Clean and Renewable energy
Sustainable Cities & Communities
Climate Action
Life Below Water
Life on Land

विद्यार्थी त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वापरून या तीनही क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधतील. विद्यार्थी संबंधित क्षेत्राशी निगडीत समस्या ओळखून त्यावर संशोधन करून सुरुवात करतील. नंतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते त्यावर पर्याय शोधतील आणि सदर समस्या अधोरेखित करण्यासाठी एक प्रोजेक्ट /प्रकल्प विकसित करतील. या स्वयं-प्रेरित शिक्षणाच्या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचे STEM विषयक ज्ञान समृद्ध होईलच, पण समाज आणि वसुंधरे विषयी आपुलकीची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

थिंक बिग प्रोग्रामचा हा वार्षिक समारोप कार्यक्रम असल्या कारणाने, हा सायन्स कार्निव्हल विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी आणि त्यांनी शिकलेल्या गोष्टी सामाजिक पातळीवर लागू करण्यास प्रोत्साहित करेल. या कार्निवल मध्ये NMMC च्या ५० शाळांमधील एकूण ३०० विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

 

Marathi